December 23, 2024

Coronavirus | राज्यात आज 811 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 7628

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 811 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 7628 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 13 जण मुंबईचे तर पुण्यातील चार आणि मालेगाव, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, धुळे, सोलापूर येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 323 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 119 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 8 हजार 972 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 162 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 7628 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 25 हजार 293 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 8124 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 957 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरूष तर 6 महिला आहेत. त्यातील 11 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 8 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर तीन रुग्ण 40 वर्षांखालील आहे. मृत्यू झालेल्या 22 रुग्णांपैकी 13 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे आजार आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *